न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २३) :- पिंपळे सौदागर येथील लिनीअर अर्बन गार्डन (गोविंद चौक) येथे रविवार (दि. २३) रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सी. एम. चषक अंतर्गत चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमधे १५० ते २०० मुलांनी आपला सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ काटे, संजय कुटे, कैलास कुंजीर, किरण केसवड, सुप्रिया पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये लहान मुलांसोबत पालकांनी देखील आपला सहभाग नोंदवला. यावेळी मुलांनी ‘बेटी बचाव बेटी पढाओ’, स्त्री भ्रूण हत्या, स्वच्छ भारत अभियान, जलसंवर्धन, निसर्गचित्र या समाजजागृती करणाऱ्या विषयांवर चित्र रेखाटन केले.
नियोजकांकडुन मुलांना चित्रकला उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. अतिशय उत्साही वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडली.















