- जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२१) :- वाकड येथील एका हॉटेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. विठ्ठलवाडी सिंहगड रस्त्यावरील २७ वर्षीय तरूण हा वाकड, भूमकर चौकातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता.
तो २१ मार्चला तिथे आला होता. त्यानंतर तरूण गंभीर झाल्यानंतर त्यास २५ मार्चला रात्री सव्वा नऊला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रात्री साडेदहा वाजता त्याचा मृत्यू झाला. २५ मार्चला मृत्यू झाला. कोविडमुळे त्या तरूणाचा मृत्यू झाला आहे, असे वैद्यकीय तपासणी अहवालात नमूद केले आहे.
कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती संकलित करत असताना हा रुग्ण वाकड मधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मृत्यू झालेल्या हॉटेलमध्ये असणारे सीसीसी सेंटरबाबत माहिती मागविली आहे.