- नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर अडचणीत..
- विभागीय आयुक्तांकडून कार्यवाहीचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांच्या कुटूंबियांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मास्क पुरवठा निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. याची निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन त्यांच्या कंपनीस महानगरपालिकेने रक्कम देखिल अदा केली आहे. अशी तक्रार माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडे केली होती.
ननावरे यांच्या तक्रार अर्जाची विभागीय आयुक्तांनी दखल घेतली आहे. प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेऊन आर्थिक लाभ घेतल्या प्रकरणी त्यांचे पद रद्द करुन नगरसेवक म्हणून असलेले सर्व लाभ तात्काळ थांबविणेबाबतची मागणी ननावरे यांनी केली होती.
या विषयी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी अर्जावर आपले स्तरावरुन उचित कार्यवाही करुन अर्जदार यांना कळविण्यात यावे असे आदेश पुणे विभागीय कार्यालयातून २६ मार्च रोजी प्र. उपायुक्त, नगरपालिका प्रशासन, डॉ. प्रदिप ठेंगल यांनी दिले आहेत. तसे पत्र पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडून ननावरे यांना देण्यात आले.