- पालिकेकडून पाळीव प्राण्यांचे दहन शुल्क निश्चित..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत नेहरुनगर, पिंपरी येथे पाळीव प्राणी (कुत्रा, मांजर) दहन मशिन (Pet Khaneralon) स्थापित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सन २०१६ पासुन आजतागायत शहरातील नागरिकांना त्यांचे पाळीव प्राणी निःशुल्क दहन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
तथापि स्थायी समिती सभा ठराव क्र. ७८६१ दि. २३/१२/ २०२० तसेच मा. महापालिका सभा ठराव क्र. ५८८ दि. २०/०१/२०२१ च्या मान्य ठरावान्वये पिपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील तसेच हद्दी बाहेरील छोटे पाळीव प्राणी (कुत्रा व मांजर) यांच्या दहन शुल्काची रक्कम रुपये १००० / -प्रति प्राणी) इतकी आकारणेस मान्यता घेण्यात आली आहे.
त्यानुसार दि. ०१/०४/२०२१ पासुन छोट्या प्राण्यांकरीता दहन शुल्का र रु. १०००/ – इतके आकारण्यात येईल, असा आदेश पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.