- सुरेश लिंगायत यांचे शहरातील पीठगिरणी चालकांना बंदचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२१) :- पीठ गिरण्या चालकांनी दररोज सायंकाळी सहा वाजता गिरणी बंद करावी. गिरणीचे मेंटेनन्स दुपारच्या सदरात करावे जेणे करुन जेवणानंतर गिरण्या फार वेळ सलग बंद राहणार नाही. ग्राहकांची सेवा नियमित राहील व गर्दी होणार नाही. दर शनिवारी व रविवारी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन गिरण्या बंद ठेवाव्यात. चालकांनी चेहर्यावर मास्क अथवा रुमाल लावावा.
ग्राहकांनी गिरणीत अकारण गर्दी करु नये किंवा चालकाशी दळण लवकर द्यावे म्हणून वाद घालू नये. शनिवार व रविवार सलग दोन दिवस लॉकडाऊनमुळे गिरण्या बंद राहणार आहेत. त्यामुळेच महावितरणने नेहमीप्रमाणे गुरुवारी शटडाऊन न घेता विज पुरवठा अखंड चालू ठेवावा.
तसेच फावल्या वेळात स्वतःच्या जबाबदारीवर चांगल्या प्रतिचे धान्य गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळ, नाचणी दळून ग्राहकांना व्रिकीची व्यवस्था करावी, असे पिंपरी-चिंचवड चालक मालक पीठगिरणी महासंघाचे शहराध्यक्ष सुरेश लिंगायत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.