- पिंपरी चिंचवड शहरातील कामगार वर्गाची चिंता मिटली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१० एप्रिल २०२१) :- राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवारी आणि रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन लागू आहे. त्यानुसार पूर्णवेळ मेडिकल व दूध विक्री (सकाळी) वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. उद्योग, कारखाने शनिवारी आणि रविवारी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शनिवारी, रविवारी लॉकडाऊन आहे किंवा नाही. याबाबत उद्योजक संभ्रमावस्थेत होते. कंपन्या चालू आहेत की बंद, हा प्रश्न विचारला जात होता. मात्र, नियमावलीनुसार उद्योगांना सूट दण्यात आलेली आहे. याबाबत सुधारित आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
एमआयडीसी परिसरातील सर्व कारखाने या काळामध्ये सुरू ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आलले आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणे, तसेच त्यांची आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीकरण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.