न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि. १०) मास्क न वापरल्या प्रकरणी ३७६ जणांवर कारवाई केली आहे. शहरात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे.
विनामास्कची ही कारवाई एमआयडीसी भोसरी (५५), भोसरी (१४), पिंपरी (१०), चिंचवड (७६), निगडी (२३), आळंदी (११), चाकण (३१), दिघी (०७), सांगवी (०५), वाकड (२४), हिंजवडी (११), देहूरोड (१४), तळेगाव दाभाडे (००), तळेगाव एमआयडीसी (१५), चिखली (२७), रावेत चौकी (२८), शिरगाव चौकी (१८), म्हाळुंगे चौकी (०७)