- टेम्पो ड्रायव्हरकडून साडेसात लाखांचे जॉब लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२१) :- एमआयडीसी भोसरीमधील थर्मल इंजिनिअरिंग सिस्टिम्स या कंपनीतून सात लाख ५० हजार १६० रुपये किमतीचे इंटरनल बर्नर असेम्बली यु एफ २०६० हे आठ जॉब टेम्पोमध्ये (एम एच ०४ / ई वाय ६८०४) भरले. हे जॉब निगडी येथील असोसीएटेड रोड कॅरीअर्स येथे पोहोच करायचे होते.
आरोपी टेम्पो चालक जॉब घेऊन निगडी येथे पोहोच न करता टेम्पोसह पळून गेला. हा प्रकार ३० मार्च रोजी दुपारी भोसरी एमआयडीसीमध्ये घडली. याबाबत १० दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळूराम फक्कड रणपिसे (वय ४६, रा. शिवाजीनगर, चाकण) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजी कारभारी आहेर (रा. पोखरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.