- जयंतीनिमित्त महापौर ढोरे यांच्या नागरिकांना शुभेच्छा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय भवनामधील महात्मा फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी चौकातील पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जयंती निमित्त महापौर यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, नगरसेवक संतोष लोंढे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप , उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, उपअभियंता संजय खरात, एकता कर्मचारी संघटनेचे गणेश भोसले आदी उपस्थित होते.
तसेच पिंपरी चौक झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, नगरसेवक संतोष लोंढे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, उपअभियंता संजय खरात, एकता कर्मचारी संघटनेचे गणेश भोसले, माहिती व जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.


















