- जागा मालक-कॉन्ट्रॅक्टरवर मुख्य उद्यान अधीक्षकांकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२१) :- महापालिकेच्या उद्यान विभागाकडून १३ झाडांचा विस्तार कमी करण्याची परवानगी घेतली. त्या परवानगीच्या व्यतिरिक्त जागा मालकाने कॉन्ट्रॅक्टरला सांगून आणखी सहा झाडे तोडली. याबाबत जागा मालक आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (दि. १०) गुलाब पुष्प उद्यानाजवळ, गवळीमाथा ते नेहरुनगर रस्ता, एमआयडीसी भोसरी येथे घडली.
मुख्य उद्यान अधीक्षक प्रकाश मोगल गायकवाड (वय ५८) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज संतू वाघमारे (रा. मु. पो. माले, ता. मुळशी), इंद्रजित हरदयाळसिंग चव्हाण (वय ४२, रा. नेहरुनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी मनोज वाघमारे याची गुलाबपुष्प उद्यानाजवळ एमआयडीसी भोसरी येथे मोकळी जागा आहे. त्याने २२ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याच्या मोकळ्या जागेतील तीन रेनट्री, एक भोकर, तीन निलगिरी, तीन काटेरी बाभूळ अशा एकूण १३ झाडांचे धोकादायक विस्तार कमी करण्यासाठी विभागाकडे अर्ज दिला होता. त्यानुसार उद्यान विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.