- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात तीन हजार १४० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत. त्यापैकी दोन हजार ५७४ पोलिसांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर एक हजार १५२ जणांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
मात्र करोना लसीचा दुसरा डोस घेऊनही १५ पोलीस कर्मचारी करोना बाधित झाले आहेत. उर्वरित ५६६ कर्मचाऱ्यांपैकी काही महिला कर्मचारी गरोदर असून काही स्तनदा माता आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील आत्तापर्यंत ७२९ पोलसांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. तर सध्या ८८ पोलीस कर्मचारी बाधित आहेत. त्यापैकी ७१ जण गृहविलगीकरणात असून १७ जणांवर विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन पोलीस कर्मचारी ऑक्सिजनवर आहेत.