- पिं. चिं. शहरात आज १८३८ जणांना बाधा; ४१ रुग्णांचा मृत्यू तर, २८१२ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १३) रोजी १८३८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २८१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष – रावेत ( ४१ वर्षे ) , बिजलीनगर ( ७६.५१ वर्षे ) , आकुर्डी ( ५२ , ४१ वर्षे ) , चिखली ( ७५ , ६९ वर्षे), मोशी ( ३५ , ६४ , ६२ वर्षे ), पिं. गुरव ( ४३ वर्षे ) , पिंपरी ( ६३ वर्षे ) , रहाटणी ( ४९ वर्ष ) , निगडी ( ४२ वर्षे ) , सांगवी ( ७४ वर्षे ) , १० स्त्रिया – पुनावळे ( ३५ वर्षे ) , सांगवी ( ६ ९ वर्षे ) , चिंचवड ( ५४ , ६३ वर्षे ) , पिंपरी ( ५९, ५९ वर्षे ) , संत तुकारामनगर ( ७० वर्षे ) , आजमेरा ( ६० वर्षे ) , बोपखेल ( ३५ वर्षे ) , चिखली ( ७१ वर्षे ) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०९ पुरुष- बिबवेवाडी ( ३७ वर्षे ) , हिंजवडी ( ३६ वर्षे ) , जुन्नर ( ६७ वर्षे ) , खडकी ( ५६ वर्षे ) , धुमाळवाडी ( ५२ वर्षे ), धाणोरी ( ६२ वर्षे ) , सिंहगड रोड ( ८४ वर्षे ) , देहूगाव ( ७४ वर्षे ) , कर्वेनगर ( ३४ वर्षे ) ०७ स्त्रिया – पुणे ( ५५ वर्षे ) , वडगावशेरी ( ६५ , ६५ वर्षे ) , हडपसर ( ४० वर्षे ) , खराडी ( ३३ वर्षे ) , देहुरोड ( ६९ वर्षे ) , मुळशी ( ५५ वर्षे ) येथील रहिवासी आहे. ट आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १२ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १७१८०२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १४५२७६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २२२३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २०७, ब – ३०६, क – १७८, ड – ३२५, इ – २३०, फ – २२०, ग – २१५, ह – १५७, एकुण – १८३८
















