- पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२१) :- विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करून विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक ट्रक तसेच २७ हजारांची तीन ब्रास वाळू, असा तीन लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने वाल्हेकरवाडी ते रावेतकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिंचवड येथे मंगळवारी (दि. १३) ही कारवाई केली.
ऋषिकेश अनिल चव्हाण (वय २१, रा. वाघोली, मूळ रा. निमगाव, म्हाळुगे, ता. शिरूर), राजू परमेशर खोत (वय ३३, रा. वाघोली, मूळ रा. वाघदरा, जि. परभणी), अशी अटक करण्यात पोलीस आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह रोहित कराळे (वय ३०, रा. काळेवाडी) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चव्हाण हा ट्रक मालक आहे. तर आरोपी खोत हा ट्रक चालक आहे. तसेच आरोपी कराळे हा वाळू सप्लायर आहे. आरोपी हे वाळू चोरून त्याची विक्रीकरिता वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चिंचवड येथे वाल्हेकरवाडी ते रावेतकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला. वाळूची चोरी करून विनापरवाना रॉयल्टी नसताना चोरटी वाहतूक करून आरोपी हे वाळूची विक्री करणारा करणार असल्याचे समोर आले.