न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२१) :- दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी इमारतीच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेली एक लाख ५९ हजार १२० रुपये किमतीची केबल चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि.१२) सकाळी पवार बिल्डींग, मोहननगर येथे उघडकीस आली.
श्रद्धेश जयप्रकाश पवार (२४, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) यांनी मंगळवारी (दि. १३) पिंपरी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी इमारतीच्या स्टोअर रूममध्ये एक लाख ५९ हजार १२० रुपयाच केबलचे सहा बंडल ठेवले होते. रविवारी रात्री दहा ते सोमवारी सकाळी सहाच्या कालावधीत चोरट्यांनी दरवाजाना कडी-कोयंडा तोडून बंडल लंपास केले.
















