- शिवीगाळ व धक्काबुक्कीसह सरकारी कामात अडथळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२१) :- अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपींनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १३) रात्री सव्वाआठ वाजता महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी येथे घडली.
महेंद्र सुदाम कदम (वय ३०, रा. महात्मा फुले नगर, भोसरी), हनुमंत आप्पी भिमाप्पा बंगार (वय ४७, रा. बेंगार चाळ, कासारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र गावडे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी गावठी हातभट्टी दारू महात्मा फुलेनगर येथे विक्री करत होते. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ६० लिटर गावठी हातभट्टी दारू रोख रकम असा एकूण ७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर कारवाई करत असताना आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यांनतर पोलिसांशी झोंबाझोंबी केली.
















