- दोन्ही टोळ्यात वर्चस्ववाद; गंभीर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- वर्चस्ववादातून एकमेकांवर हल्ले चढवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या निगडीतील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (दि. १५) याबाबतचे आदेश दिले.
टोळीप्रमुख साहिल ऊर्फ खाऱ्या तानाजी जगताप (२३, रा. बौद्धनगर, आकुर्डी), रोहित हिंदुराव रकटे (२४, रा. इंदिरा पॅलेस दत्तवाडी आकुर्डी), शंकर लक्ष्मण दाते (२२ रा. बळवंत कॉलनी, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडगाव), सनी तायप्पा तलवार (२५, रा. शेख चाळ, गुरुदेवनगर, आकुर्डी), आशिष केशव सुर्वे (२२, रा. त्रिमुर्ती हाऊसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर तळवडे), नितीन राजेश सोनवणे (३०, रा. चिंचवडे चाळ, चिचवडगांव), सलमान ऊर्फ सलम्या अफजल खान ( २४, रा. संघर्ष हाऊसिंग सोसायटी, ओटास्किम निगडी), कृष्णा इटकल, अबु तालीम शेख अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
या टोळीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत व बेकायदेशीररित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे असे एकूण आठ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर व सातारा जिल्हा याठिकाणी दाखल आहेत.
दुसऱ्या टोळीचा प्रमुख बॉबी ऊर्फ सुरेश विलास यादव (३३, रा. आकुर्डी) याच्यासह सनी ऊर्फ प्रवीण बाबुलाल सरपट्टा (२९, रा. बबन पांढारकर चाळ, पंचतारानगर, आकुर्डी), प्रसाद ऊर्फ तांब्या लक्ष्मण सुतार (२६, रा. देवेंद्र अपार्टमेंट, पंचतारानगर, आकुर्डी), विकी पोपट वाघ ( २६, रा. राहुल शिंदे बिल्डींग पंचतारानगर, आकुर्डी), जिग्नेश परशुराम सावंत (३०, रा. शरदनगर कॉलनी, मोरेवस्ती, चिखली), नरेंद्र ऊर्फ गुंड्या बाबुलाल सरपट्टा (२७, रा. बबन पांढारकर चाळ, पंचतारानगर, आकुर्डी), कल्पेश संदिप पवार (२५, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीतील सदस्यांच्या विरोधात देखील खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, दरोड्याची पूर्वतयारी करणे, दुखापत, दंगा, घरफोडी, मारामारी, अपहरण करुन खून, खुनाचा कट करणे व बेकायदेशीररित्या घातक शस्रे जवळ बाळगणे असे १४ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर व सातारा जिल्हा याठिकाणी दाखल आहेत.
या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व वाद सुरू आहे. या वादातूनच मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. याबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. या टोळ्यांनी परिसरात दहशत माजवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पीसीबी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही.व्ही चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही एन धुमाळ, पोलिस हवालदार सचिन चव्हाण, पोलिस नाईक संदिप दानवे, निलेश चासकर यांच्या पथकाने केली.