- वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- गोल्डन मोबाईल नंबर देण्याच्या बहाण्याने एकाची ६५ हजार ५५४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १४ जानेवारी रोजी वाकड येथे घडला.
याप्रकरणी शंकर मनोहर जाधव (वय ४५, रा. वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी फोनवर एअरटेल कंपनीचा गोल्डन नंबर देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्याकडून ६५ हजार ५५४ रुपये हस्तांतरित करून घेतले. त्यानंतर नंबर न देता फसवणूक केली.
















