- शहरात आज २५२९ जणांना बाधा; ५४ रुग्णांचा मृत्यू तर, २८७२ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. १६) रोजी २५२९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २८७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २३ पुरुष सांगवी (६२ वर्षे), काळेवाडी (६५, ७३, ५७ वर्ष), रुपीनगर (६६ वर्षे), चिंचवड (४२, ४७ वर्षे), पि. गुरव ५८, ६६, ७६, ३४ वर्षे), मोशी (४३ वर्षे), चिखली (६७, ६३ वर्षे), भोसरी (७५, ३० वर्षे), संत तुकारामनगर (६२ वर्ष), रावेत (४५ वर्ष), आकुर्डी (८२ वर्षे), पिंपरी (५२ वर्षे), मोरवाडी (६१ वर्षे), वाकड (८१ वर्षे), ९ स्त्रिया काळेवाडी (७० वर्षे), चिंचवड (५४, ४४, ७८ वर्षे ), संत तुकारामनगर ( ७४ वर्षे), जाधववाडी (३२ वर्षे), सांगवी (३९ वर्षे), चिखली (४४ वर्षे) निगडी (६७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु, पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १५ पुरुष- हडपसर (७०, ६० वर्षे), पिसोळी (७५ वर्षे), मोशी (३५ वर्षे), खेड (५१, ७७ वर्षे), कुरुळी (७५ वर्षे), लोहगाव (६६ वर्ष), पुणे (५३,६४,८२ वर्ष), धानोरी (५६ वर्षे), बालेवाडी (४८ वर्षे), कोंढवा (७४ वर्षे), हडपसर (७२ वर्षे), ०७ स्त्री – पुणे (७१.२ वर्षे), हडपसर (६८, ६८ वर्षे), अहमदनगर (७८ वर्षे), पुणे (४० वर्षे), तळेगाव ढमढेरे (४६ वर्ष) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १३ मृत्यू झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १७७९३४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १५३६१० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २३१७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – ३४४, ब – ४०८, क – २४४, ड – ४१७, इ – २१४, फ – ३२६, ग – ३६८, ह – २०८ एकुण – २५२९.