- पालिकेच्या कॉल सेंटरद्वारे रुग्णांना मिळतोय वैद्यकीय सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्या सर्व रुग्णांना मनपामार्फत फोनद्वारे संपर्क करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जाते.
शिवाय आवश्यकतेनुसार डॉक्टरांसमवेत या रुग्णांशी संवाद घडवून दिला जातो. जेणेकरुन त्यांना वैद्यकीय सल्ला उपलब्ध व्हावा. या रुग्णास वेळेत वैद्यकीय उपचार मिळावे याच उद्देशाने पालिकेने कॉल सेंटर (दि. १६) पासून सुरु केले आहे. सकाळी ०९.०० ते संध्याकाळी ०८.०० पर्यंत कॉल सेंटर चालू असते.
त्यानुसार (दि. २०) रोजी होम आयसोलेशनमधील रुग्ण आणि कॉल सेंटर यांच्यामधील झालेल्या संवादातील एकुण आकडेवारी २४६१४ कॉल्स प्राप्त. रुग्णांशी झालेला प्रत्यक्ष संपर्क ७५२८, Distinct Mobile Nos. Connect ५८२७, डॉक्टरांसमवेत संवाद साधलेली रुग्णसंख्या ४७१ (२७ रुग्णांसमवेत बुधवारी साधलेला संवाद), अशी आहे.