- बहिणीकडून भावावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२१) :- विनयभंगप्रकरणी सावत्र भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चिखली येथे घडला. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २९) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडित महिलेचा ३० वषीय सावत्रभाऊ, आई व बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावत्र भाऊ मंगळवारी (दि. २०) रात्री दहाच्या समारास फिर्यादी यांच्या घरासमोर आला. सावत्र बहिणीबाबत अपशब्द वापरले. तसेच दरवाजावर दगड फेकुन मारला. फिर्यादी यांनी दरवाजा उघडला नाही.
त्यामुळे बुधवारी (दि. २१) तीनच्या सुमारास फिर्यादी घरी असताना आरोपी व त्याची आई व त्याची बहीण याना घेऊन तेथे आला, त्यावेळी आरोपीनी फिर्यादीला मारहाण केली. तसेच मारून टाकण्याची धमकी देखील दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.