न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- सध्या कोरोना विषाणुंचा प्रसार आणि प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरीकांच्या आणि रुग्णांच्या मदतीकरीता विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी कोविड रुग्णालये सुरु आहेत.
महापालिकेला CSR फंडातून ३५ व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले आहेत. हेव्हेंटिलेटर पालिका हद्दीतील मोठ्या रुग्णालयांना देण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांनी घेतलेला आहे. हे व्हेंटिलेटर मोठ्या रुग्णालयांना देवून त्यांची व्हेंटिलेटरची क्षमता वाढवण्यात येणार आहे. हे व्हेंटिलेटरस् पुढील २ दिवसात बसवून कार्यान्वित करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिलेल्या आहेत.
















