- पत्नी गंभीर जखमी; भोसरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- फिर्यादी व आरोपी हे पती-पत्नी एकमेकापासून विभक्त राहतात. फिर्यादी हे आरोपी पतीला घरात घेत नसत. त्या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांना शनिवारी (दि. २४) सकाळी सात वाजता गवळीनगर येथे रस्त्यात अडवले.
त्यानंतर फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. यात फिर्यादी जखमी झाल्या. सखू दिगंबर काळे (वय ३६, रा. गवळीनगर, भोसरी) असे जखमी पत्नीचे नाव आहे.
त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जगदीश उर्फ कुमार गणपत जाधव (वय ४८, रा. रोशनगार्डनच्या जवळ, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















