- वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१):- योग्य प्रकारे खबरदारी न घेतल्याने थेरगाव येथे पी. के. मेटल्स या कंपनीत स्फोट होऊन आग लागली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजिंदरकौर प्रितपालसिंग कंधारी (वय ६५), प्रितपालसिंग कंधारी (वय ७०, दोघेही रा. बाणेर, पुणे) आणि पी.के. मेटल्सचे व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पोपट कौलगे यांनी रविवारी (दि. २५) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. २४) दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास थेरगाव येथील पी. के. मेटल्स या कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा स्फोट होऊन आग लागली.
ही कंपनी रहिवासी भागात असून याठिकाणी सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती. पी. के. मेटल्स कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाला. तसेच आसपासच्या दुकानांचे आगीमुळे नुकसान झाल्याचे फिर्यादी म्हटले आहे.















