न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१):- पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी बेटिंग किंग कमल खान याला नागपूर येथून अटक केली आहे. गहुंजे येथे २६ मार्च रोजी झालेल्या भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग घेणा-या टोळीला तीन ठिकाणाहून पोलिसांनी पकडले होते.
त्याचे धागेदोरे कमल खान पर्यंत पोहोचले आहेत, यातून हे सिद्ध होते. त्यामुळे या बेटिंग प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी ३७ जणांना अटक केली आहे.















