- कोविड रुग्णांना या खासगी रुग्णालयात उपचारात ५० टक्के सुट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड मनपास CSR फंडातून Ventilators उपलब्ध झालेले असून, हे Ventilators तातडीने सुरु करता येतील, अशा काही नामांकीत रुग्णालय ज्या ठिकाणी गॅस पाईपलाईनसह Ventilators ची सुविधा तातडीने सुरु करता येईल, अशा रुग्णालयांना तात्पुरत्या स्वरुपाचे व अटी शर्तींवर उपलब्ध करुन दिलेले आहेत.
Ventilators ची देखभाल व दुरुस्ती रुग्णालयांनी स्वतः करावयाची आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या वॉर रुम मधून नोंद झालेल्या रुग्णांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. पुरवठा केलेल्या Ventilators वर उपचार करुन घेत असलेल्या रुग्णांना Ventilators चे नियमित दराच्या ५०% दर आकारण्यात यावे या अटींवर देण्यात आलेल्या आहेत.
यात डॉ. डि. वाय.पाटील मेडिकल कॉलेज, संत तुकाराम नगर, पिंपरी, लोकमान्य हॉस्पिटल, टिळक रोड, निगडी, लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड, स्टार हॉस्पिटल, आकुर्डी, आदित्य बिर्ला हेल्थ सर्व्हिसेस लि. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, चिंचवड ५, निरामय हॉस्पिटल, चिंचवड ५, अकॉर्ड हॉस्पिटल, भोसरी ४, ब्रम्ह चैतन्य हॉस्पिटल ५, पी.डी.इ.ए. आयुर्वेद जेने. हॉस्पिटल, से.क्र.२७ आकुर्डी (स्टर्लिंग हॉस्पिटल) ४, ओजस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, रावेत २ एकुण ४८ Ventilators या सर्व हॉस्पिटलमध्ये बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णालयातील Ventilators बेड ची संख्या वाढून नागरिकांना सोय उपलब्ध झालेली आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.


















