न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ०५) रोजी २१४८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २१८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २२१४४८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९७३७२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३१७३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४१ एवढी आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३१पुरुष–थेरगाव(७१,३४वर्षे), भोसरी (३८,३६ ,५५,७८वर्षे), पिं. सौदागर (४५,६४,६१,३२, ७२वर्षे), पिं. गुरव (३५,४५,८०,४७वर्षे), रहाटणी (६३,३५वर्षे), चिखली (५०,४०,३४वर्षे),चिंचवड (९०वर्षे), आकुर्डी (७२वर्षे),निगडी(४३,७५वर्षे), रावेत (६५वर्षे), दापोडी (६७वर्षे), पिंपरी (६१,५५,६०वर्षे), नेहरुनगर (०३वर्षे), दिघी (३५वर्षे)१०स्त्री–रावेत (५७वर्षे), चिंचवड (४४,४०वर्षे), चिखली (७५,५४वर्षे), मोशी (५७वर्षे), पिंपरी (७५,६६वर्षे), आकुर्डी (७२वर्षे), आजमेरा (८३वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १९ पुरुष– खेड (४४,६५,७४,८२,५०, ५०वर्षे), फलटण (६०वर्षे), धाणोरी (६२वर्षे), कोथरुड (४२वर्षे), देहुगाव (७२वर्षे), जुन्नर (६३वर्षे), पानोडी (२९वर्षे), फुलगाव (६३वर्षे), आळंदी (४४वर्षे), पुणे (७१वर्षे), सातारा (६४वर्षे), चाकण (३८,४१वर्षे), हिंजवडी (२८वर्षे)०५स्त्री– शिरुर (५८वर्षे), पुणे (४७,८६वर्षे), खेड (८०वर्षे), आळंदी (६५वर्षे)येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १० मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ १७६, ब ३६०, क २३८, ड ३१४, इ ३८७, फ २७५, ग २३३, ह १६५, एकूण २१४८.