- अन्यथा गर्दीमुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू शकतो..
- माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीरांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच प्रभागात एकच कोविड १९ लसीकरण केंद्र असल्यामुळे केंद्रावर गर्दी होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता जास्त आहे. त्याऐवजी एक केंद्र १८ ते ४४ वर्षासाठी व दुसरे केंद्र ४५ वर्षापुढील नागरिकांसाठी राखीव ठेवावे. त्यासाठी दोन लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावीत, अशी मागणी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या शहराची लोकसंख्या पहाता जलद गतीने लसीकरण होणे गरजेचे आहे. सध्या शहरातील प्रत्येक प्रभागात एक लसीकरण केंद्र आहे. तिथे ४५ वर्षापुढील नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येत होते. १ मे पासून १८ वर्षे ते ४४ वर्षपर्यंतच्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागात दोन लसीकरण केंद्र सुरु करावेत. एका केंद्रावर १८ ते ४४ वर्षे व ४५ वर्षापुढील नागरिकां साठी वेगळे केंद्र सुरु करावे. जेणेकरून शहरातील लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व सर्वांनाच लस व्यवस्थित मिळणार असल्याने महापालिका यंत्रणेवर कामाचा ताण येणार नाही, असे या निवेदनात तापकीर यांनी म्हटले आहे.


















