न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मे. २०२१) :- ८ ‘मे’ क्रांतीवीर चापेकर बंधूंपैकी एक वासुदेव हरी चापेकर यांचा बलिदान दिवस. क्रांतीवीर वासुदेव हरी चापेकर यांच्या चापेकर चौकातील क्रां. चापेकर बंधूंच्या समुहशिल्पास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
क्रां. वासुदेव हरी चापेकर यांच्या बलिदानानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ आणि नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, महेशबाप्पू मिरजकर व मनपा कामगार नेते अविनाशजी तिकोने यांच्या वतीने क्रां. चापेकर चौकात ‘कापडी मास्कचे वाटप करुन जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी धनंजय शाळीग्राम, प्रमोदशेठ बरडीया, निषाध शिधये, दुर्गेश मिरजकर, तेजस तिकोने, निशांत पंढरपूरे, राहुल सोलाट व विशेष पोलिस अधिकारी सुभाष मालुसरे ,धनंजय कुलकर्णी, संदीप शिंदे, प्रशांत शेनोय व संतोष मोरजकर हे उपस्थित होते. यावेळी चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांचे मार्गदर्शनखाली चिंचवड चापेकर चौक येथे उबाळे मॅडम आणि कुदळे यांच्या निरीक्षणात नाकाबंदी करण्यात आली.


















