न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मे. २०२१) :- सांगवीतील मयूर नगरीत आज मंगळवारी (दि. ११) रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एमएनजीएल पाईपलाईनमधून गॅस लिकेज झाल्याने मोठी आग लागली. गॅसने अचानक पेट घेतल्यामुळे आग उंचच उंच जात होती.
गॅस पाईपलाईनवर एमएनजीएल कंपनीचे कर्मचारी काम करत होते. ब्रेकरने खोदत असताना गॅस पाईपलाईन फुटली व गॅस बाहेर पडला. मोठी आग लागली.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन मुख्य विभागाचे दोन आणि रहाटणी उपविभागाचा एक असे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र, काही वाहनांचे नुकसान झाले आहे.