न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे आज पत्रकामध्ये रुग्णसंख्येचा गोंधळ उडाला. अखेर सुधारित आकडेवारी जाहीर केली. शहरात आज बुधवारी (दि. १२) रोजी १७९० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २८८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २३६२०९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २११८७१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३४६९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४६ एवढी आहे.


















