न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. १३) रोजी १३२७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २०५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २३८७५२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २१३९२८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३५१६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४७ एवढी आहे.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आजच्या कोविड सकारात्मक रुग्णांची यादी ICMR पोर्टलवरून घेण्यात आली असता सदर यादीमध्ये २५४३ एवढ्या रुग्णांची नोंद आढळून येते. सदर यादीचे अवलोकन केले असता २५४३ पैकी १२१६ इतके रुग्ण यापुर्वी सकारात्मक असलेल्या रुग्णांच्या नोंदी ICMR पोर्टलवर झाल्याचे आढळून येते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आजचे सकारात्मक रुग्ण १३२७ आहेत.