न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. मे. २०२१) :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व स्वर्गीय तात्या बापट स्मृती समिती संचालित कोविड आयसोल्युशन सेंटर, यमुनानगर येथे अमित गोरखे युथ फाउंडेशनच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी शत-प्लस या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी आयसोलेशन सेंटरचे व्यवस्थापक विनोद डोरले, पराग सहस्रबुद्धे, अमित गोरखे, शेखर साळवे,निलेश क्षीरसागर, अमोल कुचेकर आदी उपस्थित होते.
शतप्लस कोरोनावर प्रभावी गुणकारी औषध असून औषधामध्ये अँटी ऑक्सीडेंट, अँटी इन्फर्मेशन, अँटी वायरल रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे इत्यादी गुण आहेत. नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीत सहयोगी औषधपद्धती म्हणून चांगल्या पद्धतीने हे औषध वापरले असून कोरोना रुग्णांमध्ये चांगली सुधारणा झाल्याचा अनुभव आलेला आहे.


















