- दान पेटीत जमा झालेल्या निधीतून रुग्णालयास दिले दहा ऑक्सिजन बेड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. मे. २०२१) :- पिंपरी गावातील मित्र सहकार्य तरुण मंडळाने दान पेटीत जमा झालेल्या निधीतून दहा ऑक्सिजन बेड पालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला आज शुक्रवारी (दि. १४) रोजी भेट दिले आहेत.
लोकार्पण सोहळ्यास नगरसेविका निकीता कदम, नगरसेवक संदीप वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक डब्बू आसवानी, माजी नगरसेवक संतोष कुदळे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण कुदळे, संजय गायके आदी मान्यवर उपस्थित होते. जिजामाता रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी यांनी मंडळाचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एकनाथ पारखे, कुणाल सातव, प्रसाद सातव, रविंद्र कदम, रोहन कोल्हे, डॉ. अनिकेत अमृतकर, अक्षय नाणेकर, रामदास कुदळे, शक्ती खराडे, सोमेश जमदाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा कुदळे यांनी तर, संदीप कुदळे यांनी प्रास्ताविक केले.