- मृत रुग्णाची कागदपत्रे चोरीला; रोकडही लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- फिर्यादीच्या सास-यांना कोरोनाची बाधा झाली होती, ८ एप्रिल २०२१ रोजी त्यांना उपचारांसाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशी (दि. ९) त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या जवळील साहित्य सेंटर मधून चोरीला गेले. यामध्ये रोख रक्कम दहा हजार रुपये, पॅनकार्ड, आधार कार्ड, पॉलिसी कार्ड, एटीएम अशा गोष्टींचा समावेश होता. असे फिर्यादीत म्हटले आहे.
महेंद्र विश्वासराव फणसे (वय ५१, रा. टिंगरे नगर, धानोरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















