- वाकडमधील घटना; दोघेजण गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- फिर्यादीने नानकेट बिस्किटांचे पैसे मागितले म्हणून आरोपीने सत्तूराने फिर्यादीच्या गुडघे, पाठीवर व गालावर वार केले. तसेच, त्याच्या इतर साथिदारांनी फिर्यादी याला लाथाबुक्क्यांनी मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी सातच्या सुमारास वाकड परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी नंदलाल बताप्रसाद वर्मा (वय ४२, रा. रहाटणी, मुळगाव – मध्य प्रदेश) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर संभाजी नलावडे (वय २३, रा. आदर्श कॉलनी) व शुभम वसंत पंडित (वय २२, रा. आदर्श कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच, त्यांच्या इतर दोन साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















