न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. मे. २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब कुटुंबीयांना आपल्या परीने दिलासा देण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष व रहाटणीतील सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कुटे यांनी आपले मित्र गणेश घाटोळकर यांना सोबतीला घेऊन ‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान’ या जाणिवेतून गोरगरीब जनतेसाठी अन्नदान केले.
कुटे यांनी आपल्या घरीच परिवारासमवेत विविध प्रकारचे जेवण तयार करून त्याचे वाटप केले. आकूर्डी येथील अनाथालय, अंध- अपंग बांधवांपर्यंत जाऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.
रस्त्यावर फिरणार्या निराधार व्यक्ती तसेच निराधार मुलांना अन्न तसेच बिस्कीटाचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले. तसेच कुटे यांनी आळंदी येथील वारकरी संस्थेमध्ये किराणा मालाचे वाटप केले. त्यांच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केले.


















