- भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. मे. २०२१) :- महिलेकडे वारंवार पैशाची मागणी केली. तसेच, मुलगी झाली म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार एप्रिल २०१६ ते जानेवारी २०२१ दरम्यान भोसरी एमआयडीसी परिसरात उघडकीस आला.
महिलेनं रविवारी (दि.२३) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश विठ्ठल नलावडे, कविता विठ्ठल नलावडे, विठ्ठल हरिभाऊ नलावडे, शितल गोरख शेलार व गोरख शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















