- वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. मे. २०२१) :- पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना थेरगाव येथे शनिवारी (दि. २२) रात्री घडली.
नारायण शेट्टीबा धोत्रे (वय ५७), तुषार नारायण धोत्रे (२५, दोघेही रा. जय मल्हार नगर, थेरगाव), प्रकाश गौतम भवार (३० रा, रिव्हर रोड, पिंपरी) आणि अमृत विजय वीटकर (२८, रा. आदर्शनगर, काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अल्लादीन दस्तगीर पटेल (३१ रा. जय मल्हारनगर, थेरगाव) यांनी रविवारी (दि. २३) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
















