- पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे जगन्नाथ काटे व कुटुंबियांचे सामजिक दातृत्व…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. मे. २०२१) :- पिंपळे सौदागर येथील काटे परिवाराने अनावश्यक खर्च टाळून लग्नसमारंभादिवशी महापालिकेच्या आरोग्य विभागास ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
पिंपळे सौदागरच्या पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे यांची कन्या प्रणिता व वाकड येथील अरुण पवार यांचे चिरंजीव अक्षय यांचा विवाह सोहळा शनिवारी गोविंद गार्डन येथे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून नातेवाईकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने संपन्न झाला.
या सोहळ्याच्या निमित्ताने वधू- वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित खा. श्रीरंग बारणे, आ. लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडे हे ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर सुपूर्द करण्यात आले.

















