न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २८ डिसें.) :- पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट गडद असतानाच पालकमंत्री गिरीश बापट यांच्याविरोधात बॅनरबाजी सुरु झाली आहे. काय रे गिरीष?, दुष्काळ असतानासुद्धा अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही, अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे.
हा बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, हे बॅनर कोणी लावले याबाबत अद्यापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही.
पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास जरी टळले असले तरीही पाणीकपात निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांच्यावर टीका करणारे बॅनर शहराच्या विविध भागात लावण्यात आले आहेत. यावर, काय रे गिरीष?, दुष्काळ असतानासुद्धा अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही. तू तर आपल्या शहरातला ना? पाणी कुठं मुरतंय ? असे प्रश्न विचारण्यात आले असून बॅनरखाली एक त्रस्त पुणेकर लिहिण्यात आले आहे.










