न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ जुलै २०२६) :- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आमच्या माननीय उपाध्यक्षा सौ. अनिता ताई काटे आणि प्राचार्या सौ. ज्योतिका मलकानी उपस्थित होत्या. तसेच पालकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभंग गायन, कीर्तन, पारंपरिक नृत्य सादरीकरण अशा विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत वारकरी संप्रदायाची सुंदर झलक सादर करत भगवान विठ्ठल आणि संत तुकाराम महाराजांना अभिवादन केले.
या कार्यक्रमामुळे शाळेत भक्तीमय वातावरण निर्माण झाले आणि विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती व परंपरांचे महत्त्व समजले.
या सुंदर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर व पालकांचे शाळा मनःपूर्वक आभार मानते.


















