- दोन चोरटे पोलिसांच्या अलगद जाळ्यात; गुन्हाची कबुली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२१) :- कोविड सेंटरमधील रुग्ण व मयतांच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी आरोपी काळेवाडी परिसरात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळेवाडी येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नऊ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
बाणेर येथील जम्बो कोविड सेंटरमधील उपचार घेणारे रुग्ण व मयताच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. दागिने चोरीप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
शारदा अनिल आंबिलठगे (वय ३६), अनिल तुकाराम संगमे (वय ३५, दोघेही रा. रहाटणी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.