- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २ जून २०२१) – मोशीतील सस्तेवाडी परिसरातील रहिवाशी फिर्यादी व आरोपी यांच्यात फेब्रुवारीमध्ये भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीवर कोयत्याने वार केले. तुला खल्लास करून टाकतो, असे म्हणून शिवीगाळही केली.
तसेच गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. सौरभ ज्ञानेश्वर गायकवाड (वय २१, रा. भारत माता चौक, मोशी) यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. १) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हर्षल बोराटे, सुरज महाजन (दोघेही रा. मोशी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.


















