- भोसरी पोलीसांकडून वाहन चोरीच्या तब्बल २१ गुन्ह्यांचा पर्दाफाश..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२१) :- ‘ गोल्ड मॅन ‘ दत्ता फुगे याच्या खूनातील पॅरोलवर सुटलेल्या आरोपीसह त्याच्या साथीदार टोळीच्या भोसरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या शिवाय भोसरी परीसरात वाहन चोरी तसेच जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर देखील भोसरी पोलीसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलीसांनी वाहन चोरीचे एकुण २१ गुन्हे, जबरी चोरीचे ३ गुन्हे, अवैधरित्या शस्र बाळगलेले ०३ पिस्टल आणि ०६ जीवंत काडतुस असा एकुण १८ लाख ९५ हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी पोलीसांच्या या कामगिरीचे कौतुक करीत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चाळीस हजाराचे बक्षिस आणि प्रमाणपत्र जाहिर केले आहे.
पोलीस शिपाई गणेश याना माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना पिस्टल जवळ बाळगुण फिरत आहेत. यामध्ये गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या खूनातील पॅरलवर सुटलेला आरोपी देखील आहे. पोलीसांनी तत्काळ प्रसन्ना उर्फ सोनु ज्ञानेश्वर पवार (वय -२६ वर्ष), अंकुश उर्फ तात्या रंगनाथ डागले (वय – २९), प्रमोद उर्फ कक्का संतराम धौसपूरीया यांना ताब्यात येऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकड ०३ पिस्टल, ०६ जीवंत काडतुसे असा एकूण ९३ हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस भोसरी पोलीसांनी वाहन चोरट्यांना शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथक तयार केले होते. दरम्यान, पोलीस शिपाई सुमित देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय संतोष मोरे (वय -२४ वर्ष), राहुल गणेश पाटिल (वय -२३) अक्षय बब्रुवान खोसे (वय -२१ वर्ष) गणेश बबन जानराव (वय २२ वर्ष) वाहन चोरांना पथकाने सापळा लावुन अटक केले.
तर दुसऱ्या पथकातील पोलीस शिपाई आशिष गोपी यांना मिळालेल्या माहितीनुसार अशरद हनिफ सय्यद ( वय -२१ वर्ष) आणि अनिकेत सचिन झेंडे (वय २० वर्ष) यांच्यासह दोन विधी संघर्षित बालकांना पथकाने ताब्यात घेतले आहे. चौकशी अंतर्गत त्यांच्याकडून एकुण १३ गुन्हे उघडकिस मुद्देमाल केला आहे. या टोळीकडुन भोसरी एमआयडीसी, चाकण, कोथरुड, स्वारगेट, सहकारनगर राजगड, दिघी आणि सांगवी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या वाहन चोरीचे एकुण २१ गुन्हे उघडकिस आणले आहेत.
भोसरी पोलीसांची कारवाई सुरु असताना कासारवाडी व दापोडी परीसरात रात्रीच्या वेळी वाहनांना अडवुन त्यांना हत्याराना धाक दाखवुन लुटमार सुरु असल्याची माहिती पोलीस शिपाई मागर जाधव यांना मिळाली होती. त्या अनुशंगाने राजेश बैजु नेटके (वय २३ वर्ष) याला पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्याने साथीदार सागर राजु नायर (वय -१९ वर्ष ) आणि सिद्धार्थ उर्फ भाच्या (रा. कासेवाडी, झोपडपट्टी, पुणे) यांच्या मदतीने जबरी चोरी करीत असल्याचे पोलीसांना सांगितले. पोलीसांनी त्यांच्याकडुन एकुण ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी आणि सांगवी पोलीसांनी एकुण ०३ जबरी चोरीचे गुन्हे उघडकिस आणले आहेत.