- सात लाख रुपयांचा अपहार; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. जून. २०२१) :- चिंचवडमधील डेटा केअर कॉर्पोरेशन या कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरीस असताना बिलाचे सर्व काम पाहणे ही आरोपीची जबाबदारी होती. ग्राहकांनी वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूचे बिल त्यांना देऊन बिलाचे पैसे कंपनीकडे जमा न करता स्वतःकडे ठेवून आरोपीने कंपनीच्या संगणकातील सिस्टीममध्ये ती रक्कम आऊटस्टँडिंग दाखवली.
नवीन ग्राहकाने वस्तू घेतल्यास पूर्वीचे बिल क्लोज करून नवीन बिल आऊटस्टँडिंग दाखवले. अशा प्रकारे खोटे हिशोब तयार करून कंपनीचा सात लाख ३७ हजार ७० रुपयांचा अपहार केला. हा प्रकार १४ जानेवारी २०२० ते २५ सप्टेंबर २०२० या कालावधीत घडला.
मेतानंद मोहन हाडमोडे (वय ३८, रा. अंकुश चौक, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या अकाउंटचे नाव आहे. याबाबत विजय चांगदेव शिरसाठ (वय ३८, रा. पिंपळे गुरव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.