न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जून. २०२१) :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन भाजपा युवा मोर्चाने स्नेहछाया बालक अनाथ आश्रम, दिघी व पुनरुत्थान समरसता गुरुकुल, चिंचवड येथे ‘फ्रुट पार्टी’ चे आयोजन केले होते. मुलांना फळांची मेजवानी दिली. बियांपासुन रोपटे कसे बनवावे याचे प्रशिक्षण दिले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, पूजाताई आल्हाट, पंकज शर्मा, जयदीप कर्पे, चिटणीस रवी जांभुळकर, प्रकाश चौधरी, सोशियल मीडिया संयोजक विक्रांत गंगावणे, प्रियांका शाह सिंग, अर्पिता कुलकर्णी, दिगंबर गुजर, सुहास आढाव, प्रमोद पठारे, अनिकेत देवरमानी तसेच संजयभाऊ गायकवाड व दत्तात्रय इंगळे सर उपस्थित होते.

















