- १८ ते ४४ तसेच ४५ वयोगटावरील लाभार्थ्यांचे कोविड लसीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जून. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या (दि. १०) रोजी गुरुवारी ‘कोव्हॉक्सीन’ चा फक्त दुसरा डोस हा वय वर्षे १८ ते ४४ वर्षावरील २८ दिवस झालेल्या १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै. ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी. यमुनानगर रुग्णालय. सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी. खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव. अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा. आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एमरुग्णालयाजवळ. नविन जिजामाता रुग्णालय. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
दरम्यान ‘कोव्हॉक्सीन’ चा फक्त दुसरा डोस हा वय वर्षे ४५ वर्षावरील २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने प्राथमिक शाळा मोरे वस्ती-म्हेञे वस्ती. प्रेमलोक पार्क, दवाखाना. नविन भोसरी रुग्णालय. अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर. नेहरुनगर उर्दु शाळा. पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ. इ.एस.आय.एस हॉस्पीटल मोहननगर, चिंचवड. कासारवाडी दवाखाना. या आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
तसेच उद्या वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, रोटरी क्लब सेंटर, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा, चिखली, घरकुल दवाखाना चिखली, साई आंब्रेला संभाजीनगर दवाखाना, महापालिका शाळा जाधववाडी, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, रुपीनगर शाळा, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, महापालिका शाळा खराळवाडी, एसएस अजमेरा स्कुल, अजमेरा, दीनदयाल शाळा संत तुकारामनगर, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, क्वालिटी सर्कल भोसरी, समता स्कुल चक्रपाणी वसाहत भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, महापालिका शाळा बोपखेल, सखुबाई गार्डन भोसरी, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, नटसम्राट निळू फुले रंगमंदिर सांगवी, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव, महापालिका शाळा रहाटनी, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीवाघेरे, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, महापालिका शाळा किवळे, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या ४९ लसीकरण केंद्रावर १५० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि. १०/०६/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.