न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२१) :- चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून सालाबादप्रमाणे श्री मंगलमूर्तींची ज्येष्ठी यात्रा चिंचवड ते नारंगी अशी संपन्न होत असते. दरम्यान दि. १३ ते १५ जून २०२१ रोजी होणारी ज्येष्ठी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार १५ जूनपर्यंत जिल्हाबंदी, संचारबंदी जमावबंदी व वाहतूक मनाई आहे. शहरी भागात जरी नियमांमध्ये शिथिलता केली असली. तरी ग्रामीण भागामध्ये अजूनही कोरोना संक्रमणाचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे मंगलमूर्तींची ज्येष्ठी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.