- कष्टक-यांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारली; आयुक्त जातिवादी – बाबा कांबळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून. २०२१) :- रिक्षा चालक,फेरीवाले,घरकाम महिला गटाई कामगार यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आज कष्टकरी जनता आघाडी वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर मनपासमोर आंदोलन आंदोलन करण्यात आले.
धुणीभांडी स्वयंपाक करणाऱ्या महिला, रिक्षाचालक ,फेरीवाले, गटई कामगार जिम ट्रेनर यांना तीन हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु मनपा आयुक्त आणि त्याचे प्रशासन या योजनेत खोडा आणत आहेत. मनपाच्या या लहरी कारभाराविरोधात कष्टकरी जनतेच्या वतीने दिनांक १४-६- २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड मनपा कार्यालयासमोर कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वा खाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिता सावळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, शहराध्यक्ष रमेश शिंदे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार, रिक्षा ब्रिगेडचे प्रमुख बाळासाहेब ढवळे, शहराध्यक्ष धनंजय कुदळे, विजय ढगारे, अविनाश जोगदंड, लक्ष्मण शेलार,तुषार लोंढे, जाफर भाई शेख, सिद्धेश्वर सोनवणे ,सुरज सोनवणे ,अजय साळवे, प्रदीप अहिरे ,नंदलाल निकम आदीनी सहभागी घेतला.
आमच्या गरीबीची थट्टा केली जात असून आम्ही आर्थिक अडचणी मध्ये असताना आम्हाला हिणवले जात आहे. आमचा अपमान केला जात आहे. आम्ही कष्ट करतो, सन्मानाने जगतो आम्हाला कमजोर समजू नका. आयुक्त राजेश पाटील यांनी आमच्या शिष्टमंडळाची भेट नाकारली. हा आयुक्तांचा मग्रुरीपणा चालणार नाही. त्यांच्या डोक्यात अजूनही पाटीलकी असून हा एक जातीवादी आहे, असा आरोप बाबा कांबळे यांनी दिला आहे.
















