- महापौरांकडून लसीकरण केंद्राची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२१) :- महापालिकेच्या वतीने प्रभाग स्तरावर ह क्षेत्रीय कार्यालय कासारवाडी येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु करणेत आले आहे. या केंद्रास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी भेट देऊन लसीकरण केंद्राची पाहणी केली.
तसेच त्याठिकाणी देण्यात येणा-या सेवा सुविधा, अडीअडचणींबाबत महापौर ढोरे यांनी प्रशासनास विविध सुचना दिल्या. नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही यासंबंधी दक्षता घेण्यात यावी असे निर्देश दिले.
त्यांचेसमवेत नगरसेविका शारदा हिरेन सोनवणे, ह क्षेत्रिय अधिकारी अभिजित हराळे यांचेसह वैद्यकीय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
















